महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऐन महामारीत डाळीसह पालेभाज्या महाग; गृहिणींचे कोसळले बजेट

आयातशुल्क वाढल्याने खाद्यतेल महागले आहे. तर डिझेलचे दरही वाढलेले आहेत. अशा स्थितीत उपभोग्य अशा सर्व वस्तुंचे दर वाढले आहेत.

inflation
महागाई

By

Published : Apr 8, 2021, 3:57 PM IST

नवी दिल्ली- धान्य, डाळी, पालेभाज्या, फळे आणि विविध खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे ऐन महामारीत सामान्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

आयातशुल्क वाढल्याने खाद्यतेल महागले आहे. तर डिझेलचे दरही वाढलेले आहेत. अशा स्थितीत उपभोग्य अशा सर्व वस्तुंचे दर वाढले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबई विमानतळावर भरावा लागणार १ हजार रुपये दंड

  • देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये पामतेलाचे दर गेल्या वर्षभरात ७४ टक्क्यांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक स्वस्त मानल्या जाणाऱ्या पामतेलाचे दर हे सोयाबीनच्या तेलाहून अधिक जास्त आहेत.
  • सेंट्रल ऑर्गानायझेशन फॉर ऑईल इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे (सीओएटी) लक्ष्मीचंद अग्रवाल म्हणाले, की आयातशुल्क लागू नसले तरी मोहरीच्या तेलाचा दर प्रति लिटर २०० रुपयांहून अधिक आहे. केवळ खाद्यतेलच नव्हे तर डाळीच्या किमतीही वाढल्या आहेत.
  • ग्राहकव्यवहार मंत्रालयाचे सचिव लीना नंदन म्हणाले की, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. नवीन आयात कोटा खुला करण्यात येत आहे.
  • कोरोनाच्या काळात धान्य, पालेभाज्या आणि फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोसळलेले आहे.
  • ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे सुरेश अग्रवाल म्हणाले की, डाळीच्या मागणीत वाढ झाले आहे. कमोडिटी तज्ज्ञाच्या मतानुसार पालेभाज्यांचे दर वाढतात तेव्हा डाळींची मागणी वाढते. गव्हाचा बाजारात पुरेसा पुरवठा झाला तर बाजारातील किमती कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, गव्हाच्या पिठाचे दर अजूनही कमी झालेले नाहीत.

हेही वाचा-18 ते 45 वयोगटासाठी कोरोना लसीकरण खुले करा- फिक्कीची सरकारकडे मागणी

यमुना विहारमधील रहिवासी नीतू गुप्ता म्हणाल्या की, यापूर्वी तांदळाचे दर ५० रुपये आणि 60 रुपये होते. हे दर वाढून ८० रुपये झाले आहे. तर २५ किलो असणाऱ्या गव्हाचे पीठ हे ३० रुपये आणि ३५ रुपये प्रति किलो झाले आहे. खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने स्वयंपाकघराचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details