नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाई सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढून ४.६२ टक्के झाली आहे. खाद्यजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने ही महागाई वाढली आहे.
केंद्र सरकारकडून महागाई दराबाबतची आर्थिक आकडेवारी २०१२ पासून जाहीर करण्यात येते. त्यानुसार आज आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा-लग्नसराईकरता ग्राहकांकडून वाढली मागणी; सोने प्रति तोळा २२५ रुपयांनी महाग
- किरकोळ बाजारपेठेत ग्राहक किंमत निर्देशांक सप्टेंबरमध्ये ३.९९ टक्के राहिला आहे. तर ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ३.३८ टक्के राहिला आहे.
- खाद्यजन्य पदार्थांच्या वर्गवारीत (बास्केट) महागाई ही ऑक्टोबर २०१९ मध्ये वाढून ७.७९ टक्के झाली आहे. तर सप्टेंबरमध्ये खाद्यजन्य पदार्थांच्या वर्गवारीत महागाई ही ५.११ टक्के होती.