नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाई सप्टेंबरमध्ये वाढून ३.९९ टक्के झाली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने किरकोळ बाजारपेठेतील महागाई वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून येते.
ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित ऑगस्टमध्ये ३.२८ टक्के महागाईची नोंद झाली होती. तर गतवर्षी सप्टेंबर २०१८ मध्ये महागाई ही ३.७० टक्के होती. अन्नधान्याच्या किमतीत सप्टेंबरमध्ये ५.११ टक्के वाढ झाली. तर ऑगस्टमध्ये अन्नधान्याच्या किमती २.९९ टक्क्यांनी वाढल्याचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी संचालनालय मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले होते.