नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना वाढत्या महागाईचा चटकाही आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. किरकोळ बाजारपेठेत महागाईने गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांक गाठला आहे. ऑगस्टमध्ये महागाईचा निर्देशांक हा ३.२१ टक्के नोंदविण्यात आला आहे.
पालेभाज्या, मासे, डाळी, मांस व मासे यांचे दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे. महागाईचा निर्देशांक जूलै २०१८ मध्ये ३.१५ टक्के तर ऑगस्टमध्ये ३.६९ टक्के नोंदविण्यात आला होता. तर ऑक्टोबरमध्ये महागाईचा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ३.३८ टक्के नोंदविण्यात आला. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा-टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका, वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांची घट
आरोग्याच्या महागाईचा निर्देशांक हा ७.८४ टक्के तर वैयक्तिक निगा आणि परिणाम (इफेक्ट) यांचा निर्देशांक हा ६.३८ टक्के नोंदविण्यात आला. तर शिक्षण क्षेत्रातील महागाई निर्देशांक हा ६.१० टक्के नोंदविण्यात आला आहे. मांस आणि मासे या वर्गवारीत ८.५१ टक्के तर डाळी आणि उत्पादनांमध्ये ६.९४ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आला. पालेभाज्यामध्ये महागाईचा निर्देशांक हा ६.९ टक्के झाल्याचे दिसून आले.