महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

किरकोळ बाजारपेठेत महागाईचा ३ वर्षातील उच्चांक; नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद - महागाई

शहर व ग्रामीण भागात अन्नाच्या (फूड) किंमती १०.०१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारपेठेतील महागाईत वाढ झाली. अन्नाच्या किंमती वाढत असल्याने महागाईत वाढ होत आहे.

Retail inflation
किरकोळ बाजारपेठेतील महागाई

By

Published : Dec 12, 2019, 7:16 PM IST

नवी दिल्ली - सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईने नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाईची नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद आली आहे. ही किरकोळ बाजारपेठेतील महागाई गेल्या ३ वर्षात सर्वाधीक आहे.

शहर व ग्रामीण भागात अन्नाच्या (फूड) किंमती १०.०१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारपेठेतील महागाईत वाढ झाली.

ग्राहक किंमत निर्देशांकात अन्नाच्या किंमतीचा ४५.९ टक्के वाटा आहे. अन्नाच्या किंमती वाढत असल्याने महागाईत वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईवर आधारित ग्राहक किंमत निर्देशांक हा ४.६२ टक्के होता. तर गतवर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक २.३३ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किंमती १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या होत्या.

हेही वाचा-मंदीचे सावट कायम... औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबरमध्ये ३.८ टक्क्यांची घसरण

नोव्हेंबर २०१६ मध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईची ४.६२ टक्के नोंद झाली आहे.

महागाईच्या आकेडवारीनुसारच आरबीआयचे ठरते पतधोरण-
भारतीय रिझर्व्ह बँक ही द्विमासिक पतधोरण जाहीर करताना ग्राहक किंमत निर्देशांकाचा (सीपीआय) विचार करते. भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईचा निर्देशांक जास्तीत जास्त ४ टक्के व कमीत कमी २ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details