महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खूशखबर! रेल्वे भरती बोर्ड चालू वर्षात २.९४ लाख रिक्त जागा भरणार - Railway Recruitment Cells

रेल्वेतील लाखो  रिक्त जागा रेल्वे भरती मंडळ (आरआरबीएस) आणि रेल्वे भरती सेलकडून (आरआरसीएस) भरण्यात येणार आहेत.

संपादित

By

Published : Jul 10, 2019, 5:02 PM IST


नवी दिल्ली - सरकारी नोकरी मिळविण्याचे तुम्ही स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये १ जूनपर्यंत २.९८ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा रेल्वे मंत्रालय चालू वर्षात भरणार असल्याची रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी संसदेमध्ये माहिती दिली. रेल्वेतील १ लाख ४२ हजार ५७७ जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकार अधिसूचना काढणार आहे.

गेल्या १० वर्षात रेल्वे मंत्रालयाने ४.६१ लाख जणांना नोकरीत घेतल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी संसदेमध्ये दिली. रिक्त पदे भरण्याची कामे सुरू असल्याचेही गोयल यांनी सांगितले. १९९१ मध्ये रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १६ लाख ५४ हजार ९८५ एवढी होती. तर २०१९ मध्ये ही संख्या कमी होवून १२ लाख ४८ हजार २०१ एवढी झाली आहे. याचा रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला नसल्याचा गोयल यांनी संसदेमध्ये दावा केला. रेल्वेतील लाखो रिक्त जागा रेल्वे भरती मंडळ (आरआरबीएस) आणि रेल्वे भरती सेलकडून (आरआरसीएस) भरण्यात येणार आहेत.

ए,बी, सी, डीच्या वर्गवारीत २ लाख 98 हजार ५७४ जागा रिक्त आहेत. २ लाख ९४ हजार ४२० जागांवर भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अशी राबविण्यात येतेय भरती प्रक्रिया
१ लाख ५१ हजार ८४३ जागांसाठी - परीक्षा पूर्ण
१ लाख ४२ हजार ५७७ जागांसाठी - घेण्यात येणार परीक्षा

नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे सेवा ही केवळ मनुष्यबळावर नव्हे तर स्वयंचलित व्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या विस्तारित वापरावरही अवलंबून असल्याचे गोयल यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details