महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2019, 4:26 PM IST

ETV Bharat / business

गुंतवणुकीला चालना देण्याकरता कॉर्पोरेट करातील कपात - के. व्ही. सुब्रमण्यम

कॉर्पोरेट करातील कपात, किमान वेतन कायदा आणि उद्योगासबंधीचे निर्णय घेण्यात आले. यामधून गुंतणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्या सुधारणांचे परिणाम दिसून येतील, अशी माहिती देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी दिली.

Chief Economic Adviser KV Subramanian
मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम

नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातील गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा मार्ग आहे. कॉर्पोरेट करातील कपात ही गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करण्यात आल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी सांगितले. ते फिक्कीच्या यंग लिडर्स समिटमध्ये बोलत होते.

मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम म्हणाले, शाश्वत आर्थिक विकास करण्यासाठी गुंतवणूक गरजेची आहे. खासगी गुंतवणुकीने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले. कॉर्पोरेट करातील कपात, किमान वेतन कायदा आणि उद्योगासबंधीचे निर्णय घेण्यात आले. यामधून गुंतणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्या सुधारणांचे परिणाम दिसून येणार आहेत.

हेही वाचा-'स्टेट बँके'चे गृहकर्जासह वाहनकर्ज स्वस्त; सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात

देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर दुसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के राहिला आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने जीडीपीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून २२ टक्के करण्याचा निर्णय घेतला. तर नव्या कंपन्यांसाठी १५ टक्के कॉर्पोरेट कर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. कॉर्पोरेट दरात कपात केल्याने विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.

हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

ABOUT THE AUTHOR

...view details