महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नव्या आर्थिक वर्षात कर्ज स्वस्त की महागणार? आरबीआय समितीची बैठक आजपासून सुरू - ICRA

आरबीआयची पतधोरण समिती ही द्विमासिक पतधोरण जाहीर करते. या  पतधोरणाची माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावर दुपारी पावणे बारा वाजता प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआय

By

Published : Apr 2, 2019, 12:39 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीनंतर गुरुवारी आरबीआय पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे रेपो दर ०.२५ टक्के कमी करण्याचा निर्णय जाहीर करतील, असा अंदाज इक्रा या पतमानांकन संस्थेने अंदाज वर्तविला आहे.

आरबीआयची पतधोरण समिती ही द्विमासिक पतधोरण जाहीर करते. या पतधोरणाची माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावर दुपारी पावणे बारा वाजता प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले आहेत. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीत सहा सदस्य आहेत. पतधोरण समितीची आर्थिक वर्ष २०१९-२०२० मधील ही पहिली बैठक असणार आहे.

रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे जाणून घ्या-

रेपो दर म्हणजे ज्या व्याज दराने आरबीआय बँकांना कर्ज देते तो दर असतो. तर रिव्हर्स रेपो दर म्हणजे आरबीआयकडील ठेवीवर बँकांना मिळणारा दर असतो. रेपो दर कमी केल्यास कर्जाचे व्याजदर कमी होतात. तर रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे दर बँकाकडून वाढविले जातात. बँकांच्या कर्जावर रेपो दर आणि रिव्हर्स रेपोचा परिणाम होतो.


ABOUT THE AUTHOR

...view details