हैदराबाद - बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्यामधील गुंतवणूक वाढविली आहे. आरबीआयकडील सोन्याचा साठा ६६६ दशलक्ष डॉलरच्या किमतीने वाढला आहे. सरकारी आकडेवारीनुसार आरबीआयकडे ३ जानेवारी २०२० ला २८.५८ अब्ज डॉलर किमतीएवढा सोन्याचा साठा आहे.
आरबीआयकडील विदेशी गंगाजळीचा साठा वाढला आहे. यामधील सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआयकडे २ ऑक्टोबर २०१९ च्या आकडेवारीनुसार २८०.३४० अब्ज डॉलरचा विदेशी चलन साठा होता. त्यापैकी सोन्याचा साठा हा ३.६७ टक्के म्हणजे १०.३१६ अब्ज मुल्याएवढा राहिला आहे. यामध्ये वाढ होवून ३ जानेवारी २०२० ला आरबीआयकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले आहे. विदेशी चलनातील साठ्यामध्ये सोन्याचे प्रमाण ३.६७ टक्क्यावरून ६.०८ टक्के झाले आहे.