हैदराबाद - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू झाली आहे. ही पतधोरण समिती ९ ऑक्टोबरला रेपो दर आणि रिव्हर्रस रेपो दर जाहीर करणार आहे. आरबीआय पतधोरणात काय निर्णय घेऊ शकते, याबाबत विविध तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीवर सरकारकडून तीन नवीन सदस्यांची निवड झाली आहे. त्याचा पतधोरणावर परिणाम होण्याची शक्यता नाही. महागाईचे प्रमाण वाढत असताना समितीकडून व्याजदर 'जैसे थे' ठेवले जाण्याची शक्यता आहे.
निर्मल बंग एक्विटीज कंपनीने म्हटले की, गेल्या नऊ महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) हा ६ टक्क्यांहून अधिक आहे. किरकोळ बाजारपेठेत जुलैच्या तुलनेत ऑगस्ट २०२० मध्ये महागाईचा दर स्थिर म्हणजे ६.७ टक्के राहिला होता. किरकोळ बाजारपेठेतील महागाई ही ४ टक्क्यांहून अधिक असावी, असे आरबीआयचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट सलग ११ व्या महिन्यात पूर्ण झाले आहे. असे असले तरी किरकोळ महागाईचे प्रमाण जास्तीत जास्त ६ टक्के ठेवण्याची मर्यादा सलग पाचव्या महिन्यात ओलांडली आहे.
हेही वाचा-एच-१बी व्हिसाच्या नव्या नियमाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे होणार नुकसान