मुंबई - जास्तीत जास्त लोकांना भारतीय अर्थव्यवस्था वाईट होत असल्याचे वाटत आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणामधून दिसून आली आहे. सर्वेक्षणातील अर्ध्याहून अधिक कुटुंबांना देशातील अर्थव्यवस्थेचे साधारणपणे दिसणारे चित्र आणखी वाईट झाल्याचे वाटते.
आरबीआयने मार्च २०१९ मध्ये सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ३२.५ टक्के कुटुंबांना अर्थव्यवस्था वाईट झाल्याचे वाटत होते. तर हे प्रमाण वाढून जानेवारी २०२० मध्ये ५४.९ टक्के झाले आहे. यामधून अर्थव्यवस्थेची प्रतिमा वाईट झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वेक्षणामधील २७.१ टक्के जणांना अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे वाटते. तर १८ टक्के कुटुंबांना स्थिती तशीच राहिल्याचे वाटते. आरबीआयने हे सर्व्हेक्षण देशातील १३ शहरांमध्ये केले आहे. यामध्ये ५,३८९ कुटुंबांतून माहिती घेण्यात आली. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आदी शहरांचा समावेश आहे.