महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

‘आरबीआयने देशाची मनस्थिती दाखवली’ - peoples confidence in India

राहुल गांधींनी ट्विट करत देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या समस्येवरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की एखादा व्यक्ती देशामध्ये रोजगार आणि अर्थव्यवस्थेबाबत अधिक वाईट बातमीची अपेक्षा करू शकतो.

संग्रहित - राहुल गांधी
संग्रहित - राहुल गांधी

By

Published : Aug 7, 2020, 6:59 PM IST

नवी दिल्ली – आरबीआयच्या माहितीप्रमाणे लोकांमधील विश्वास आजपर्यंतचा सर्वात कमी आहे, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आरबीआयने देशाची मनस्थिती (मूड) दाखविल्याचे ट्विट करत गांधींनी सरकारवर टीका केली.

राहुल गांधींनी ट्विट करत देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या समस्येवरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की एखादा व्यक्ती देशामध्ये रोजगार आणि अर्थव्यवस्थेबाबत अधिक वाईट बातमीची अपेक्षा करू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाचा मूड दाखवून दिला आहे. लोकांमध्ये आजपर्यंतचा सर्वात कमी विश्वास आहे. लोकांमध्ये असणारी भीती आणि असुरक्षितता आजपर्यंत सर्वाधिक आहे. नोकऱ्यांबाबत वाईटच अपेक्षा होवू शकते, असेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या लोकांमधील विश्वासर्हतेचा आलेखही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी ट्विट केला आहे.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर 4 टक्के हा जैसे थे ठेवला आहे. महागाईचे प्रमाण वाढल्याने हा आरबीआयने निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. देशाचा चालू आर्थिक वर्षात विकासदर उणे राहणार असल्याचाही आरबीआयने अंदाज केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details