नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या परिणामानंतर देशाची अर्थव्यवस्था हळहळू सुधारू शकेल, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. कोरोनाचा अजूनही अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्था हळहळू पूर्वपदावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर परिणाम झाला होता. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुधारेल, असा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विश्वास व्यक्त केला. जागतिक विकासदरात मोठी घसरण होईल, असा अंदाज जागतिक बँकेनेव्यक्तकेला होता. यावर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याचा मार्ग लांबपल्ल्याचा असणार आहे.
हेही वाचा-टिकटॉकला पर्याय ठरू शकणारे यूट्यूबचे 'शॉर्टस' भारतात लाँच