महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शक्तीकांत दास यांची बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कर्जाच्या व्याजदराबाबत चर्चा - RBI statement on Shaktikant Das meeting

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्याच्या आर्थिक स्थितीचे आकलन जाणून घेतले. पतधोरणातील बदल बँक ग्राहकांना देणे, विविध क्षेत्रांना वित्त पुरवठा आणि त्यांच्याकडील थकित कर्जाची माहिती शक्तिकांत दास यांनी जाणून घेतली.

शक्तीकांत दास
शक्तीकांत दास

By

Published : Dec 23, 2020, 8:20 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरकारी व खासगी बँकांचे व्यस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. या चर्चेत प्रामुख्याने वित्त पुरवठा आणि व्याजदर हे मुद्दे राहिले आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्याच्या आर्थिक स्थितीचे आकलन जाणून घेतले. पतधोरणातील बदल बँक ग्राहकांना देणे, विविध क्षेत्रांना वित्त पुरवठा आणि त्यांच्याकडील थकित कर्जाची माहिती शक्तिकांत दास यांनी जाणून घेतली. बँकिंग क्षेत्राचे सध्याच्या आर्थिक स्थितीत महत्त्व आहे, यावर शक्तिकांत दास यांनी अधोरेखित केले आहे. आर्थिक प्रोत्साहन देताना बँकिंग क्षेत्राने सहकार्य करावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा-नववर्षात निस्सानच्या ५ टक्क्यांपर्यंत वाढणार किमती

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हा दिला सल्ला-

पुन्हा स्थिती वाईट होऊ नये, यासाठी बँकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यासाटी बळकट अशी सुधारणात्मक आणि आगाऊ पावले उचलण्याची गरज आहे. भांडवल उभे करून कर्जाची क्षमता वाढवावी, असाही सल्ला दास यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. या बैठकीला आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात थकित कर्जावर तोडगा काढण्यासाठी आकृतीबंध निश्चित करण्यावरही आरबीआय गव्हर्नर दास यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशात १०० जिल्हे १०० टक्के डिजीटल होऊ शकतात, त्यावरही चर्चा करण्यात आली आहे.

हेही वाचा-सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details