मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कोरोनाचे संकट उद्भवले असताना दास यांची ही दुसरी पत्रकार परिषद असणार आहे. कोरोना आणि टाळेबंदीने अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शक्तिकांत दास काही उपाय योजना जाहीर करण्याची शक्यता आहे.
शक्तिकांत दास यांनी मागील पत्रकार परिषदेत रेपो दर हा ७५ बेसिस पाँईट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेच्या कर्जदारांना कर्जाचा मासिक हप्ता भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. टाळेबंदी वाढल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी कमी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून बाजारात अधिक वित्तपुरवठा होण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा