मुंबई - कोरोनाच्या संकटात कर्ज घेणाऱ्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ४० बेसिस पाईंटने कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर हा ४.४ टक्क्यांवरून ४ टक्के होणार आहे.
कोरोनाचा विषाणू जरी १.२ मायक्रो एवढा सूक्ष्म असला तरी जगाचे कंबरडे मोडले आहे. जगभरात कोरोनाने ३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही कोरोनाच्या संकटावर परिणाम होत असल्याने आरबीआयने पावले उचचली आहेत. रेपो दरातील कपातीचा निर्णय हा आरबीआयच्या पतधोरण समितीमध्ये पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आला आहे.
दरम्यान, कर्जदारांना कर्जाची रक्कम भरण्यासाठी यापूर्वी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. यामध्ये आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आल्याची घोषणा शक्तिकांत दास यांनी केली. त्यामुळे कर्जदारांना मार्च ते ऑगस्ट अशी एकूण सहा महिन्यांची मुदत कर्ज भरण्यासाठी मिळालेली आहे.