नवी दिल्ली - क्रिप्टोचलनाने अर्थव्यवस्थेमधील वित्तीय स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, याची भारतीय रिझर्व्ह बँकेला चिंता आहे. त्याबाबतची माहिती सरकारला कळविण्यात आल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आम्हाला निश्चितच क्रिप्टोचलनाबाबत मोठी चिंता वाटत आहे. त्याबाबत आम्ही सरकारशी संवाद साधला आहे. त्याबाबत सरकार विचार करत आहे. केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. जर आवश्यकता भासली तर संसदही त्यावर विचार करून निर्णय घेईल, असे दास यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांची बिटकॉईनमध्ये १७० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक
पुढे शक्तिकांत दास म्हणाले की, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे पूर्णपणे वेगळे आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा गैरवापर घेतला जात आहे, ही एक दुसरी गोष्ट आहे. मात्र, आमच्या दृष्टीने वित्तीय स्थिरतेबाबत चिंता आहे.