नवी दिल्ली - तुम्ही जर डेबिट-क्रेडिटचा वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) विविध बँकांसह डेबिट-क्रेडिट देणाऱ्या कंपन्यांना महत्त्वाची सूचना केली आहे. डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता वाढविण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्ड चालू-बंद करण्याचा ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी आरबीआयने सूचना केली आहे.
गेल्या काही वर्षात डेबिट-क्रेडिट कार्डातून होणारे व्यवहार आणि मुल्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करणाऱ्यांना संपर्क क्रमांक न देता व्यवहार करण्याची परवानगी असावी, असेही आरबीआयने बँकांना केलेल्या सूचनेत म्हटले आहे. ही सेवा मोबाईल अॅप्लिकेशन, ऑनलाईन बँकिंग आणि एटीएमसाठीही असावी, असेही आरबीआयने सूचनेत म्हटले आहे.