महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बँक हॉलिडेच्या दिवशीही होणार पगार; RBI ने घेतला मोठा निर्णय - बल्क पेमेंट सिस्टम

रिझर्व्ह बँकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बँक हॉलिडेच्या दिवशीही पगार खात्याच जमा होणार आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 3021 पासून लागू होईल.

रिझर्व्ह बँक
रिझर्व्ह बँक

By

Published : Jun 4, 2021, 7:24 PM IST

नवी दिल्ली - महिन्याच्या पगाराची तारखेची सर्वंच जण वाट पाहतात. मात्र, पगाराच्या तारखेच्या दिवशी दिवशी बँक हॉलिडे किंवा सुट्टीचा वार आला की हिरमोड होते. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बँक हॉलिडेच्या दिवशीही पगार खात्याच जमा होणार आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 3021 पासून लागू होईल.

पगार खात्यात जमा होण्यास उशीर झाल्याने ईएमआय उशीराने जातो. यामुळे अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. ग्राहकांची ही समस्या दूर करण्यासाठी आरबीआयने नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (NACH) आठवड्याचे 24 तासही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बॅकेला सुट्टी असली तरी खात्यातून ईएमआय भरला जाईल. म्यूचुअल फंड व इतर सर्व बिले आता बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही दिली जातील.

नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस हे एक बल्क पेमेंट सिस्टम आहे. रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (NACH) च्या सुविधेमध्ये मोठे बदल केले आहेत. एनएसीएच हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचलीत होते.

रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर केलं. आर्थिक वर्ष 2021-22 साठी देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ऋण 7.3 टक्के इतकं राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details