मुंबई– कोरोनाचे संकट हे गेल्या 100 वर्षातील आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील सर्वात मोठे संकट आहे. त्याचा उत्पादनावर अभूतपूर्व असा उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. जागतिक मूल्यवर्धित साखळी, कामगार आणि भांडवलाच्या चलनवलनावर परिणाम झाल्याचे आऱबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते सातव्या स्टेट बँकेच्या बँकिंग आणि अर्थशास्त्राविषयीच्या मेळाव्यात बोलत होते.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2019 पासून रेपो दरात 250 बेसिस पाँईटने कपात केली आहे. बाजारात पुरेशी चलनाची तरलता आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी रेपो दरात कपात केल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.