नवी दिल्ली - 'एक देश एक रेशनकार्ड'ची योजना राबविणारे पंजाब हे देशातील १३ वे राज्य ठरले आहे. त्यामुळे पंजाबला केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळण्याचा पर्याय खुला झाला आहे.
केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही सुधारणांची अट घातली होती. या अटीनुसार पंजाबने 'एक देश एक रेशनकार्ड'ची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पंजाबला खुल्या बाजारामधून १,५१६ कोटी रुपयांचे कर्ज स्वीकारण्याचा पर्याय मिळणार आहे. ही परवानगी केंद्रीय वित्तव्यव (एक्सपींडीचर) विभागाने दिली आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशने 'एक देश एक रेशन' कार्डची अंमलबजावणी केली आहे.