हैदराबाद- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०१९ मधील महागाई वाढण्याचे खापर कांदे भाववाढीवर फोडले आहे. प्रत्यक्षात किरकोळ बाजारपेठेत सर्व वस्तुंचे दर डिसेंबरमध्ये ७ टक्क्यांनी वाढले आहेत. तर कांद्याचे दर देशातील बहुतांश बाजारपेठेत प्रति किलो २०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भूतकाळातील उदाहरण देत महागाईत आणखी वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, येत्या आठवड्यात आणि महिन्यांत कांद्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा होत आहे. डाळी, औषधे व दूरसंचार कंपन्यांचे वाढलेले शुल्क यांच्यामुळे किरकोळ बाजारातील किंमतीवर दबाव राहणार आहे.
हेही वाचा-आरबीआय म्हणते, कोरोना रोगाचा पर्यटनासह व्यापारावर होणार परिणाम