ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मनमोहन सिंग, रघुराम राजन यांच्या काळात सरकारी बँकांची स्थिती अत्यंत वाईट - सीतारामन - Raghuram Rajans tenure as the central bank head

खूप विद्वान असलेल्या रघुराम राजन यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक अवस्थेत असताना मध्यवर्ती बँकेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी जवळच्या नेत्यांनी केवळ फोन केल्यानंतर बँकांकडून कर्जाचे वाटप करण्यात येत होते.

संग्रहित - निर्मला सीतारामन
author img

By

Published : Oct 16, 2019, 2:54 PM IST

Updated : Oct 16, 2019, 6:33 PM IST

न्यूयॉर्क - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारी बँकांना अत्यंत भ्रष्टाचाराच्या अवस्थेत ठेवले होते, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. त्यामुळे मनमोहन व आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या काळात सरकारी बँकांची अत्यंत वाईट स्थिती होती, असा सीतारामन यांनी दावा केला. त्या आंतरराष्ट्रीय कोलंबिया विद्यापीठात बोलत होत्या.

कोलंबिया विद्यापीठाच्या दीपक आणि नीरा राज केंद्राने भारतीय आर्थिक धोरणावर कार्यक्रमाचे आयोजन केले. नुकतेच रघुराम राजन यांनी ब्राऊन विद्यापीठात बोलताना केंद्रीकरण असल्याने मोदी सरकारने अर्थव्यवस्थेसाठी चांगली केले नसल्याचे म्हटले होते. यावर सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, खूप विद्वान असलेल्या रघुराम राजन यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक अवस्थेत असताना मध्यवर्ती बँकेची जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी जवळच्या नेत्यांनी केवळ फोन केल्यानंतर बँकांकडून कर्जाचे वाटप करण्यात येत होते. राजन यांच्या काळात बँकांच्या कर्जाचा प्रश्न होता, असेही त्यांनी म्हटले.

सध्या, सरकारी बँका या सरकारने दिलेल्या भांडवली अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. सर्व सरकारी बँकांना जीवनवाहिनी देणे हे प्राथमिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पंगारिया, प्राध्यापक आणि अर्थतज्ज्ञ जगदीश भागवती व भारताचे अमेरिकेतील राजदूत संदीप चक्रवर्ती हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

Last Updated : Oct 16, 2019, 6:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details