नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा दीर्घकाळापासून मंदावलेला आहे. त्याचा भारताच्या बाह्य क्षेत्रांवर वाईट परिणाम होईल, असे मत एसबीआयच्या संशोधन अहवालात व्यक्त केले आहे. बाह्य क्षेत्रांमध्ये एफडीआय, रुपया व देशाचे चालू खाते आदींचा समावेश होतो.
जर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती घसरलेल्या राहिल्या, तर देशाच्या चालू खात्यात अधिक निधी असणार आहे. असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 'ईकोरॅप' या अहवालात म्हटले आहे. दीर्घकाळ घसरलेल्या विकासदराचा विशेषत: रुपयावर परिणाम होईल, असे अहवालात म्हटले आहे.