नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अर्थतज्ज्ञांबरोबर आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रमुख अर्थतज्ज्ञांबरोबर घेणार बैठक - नरेंद्र मोदी
विविध अर्थतज्ज्ञ हे पंतप्रधानांसमोर कॉम्प्युटरवर त्यांच्या अर्थविषचक सूचना व कल्पनांचे सादरीकरण करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे अर्थसंकल्पात सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत चर्चादेखील करणार आहेत. ही बैठक नीती आयोगाच्या कार्यालयात होणार आहे. बैठक दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. यावेळी उपस्थित विविध अर्थतज्ज्ञ हे पंतप्रधानांसमोर कॉम्प्युटरवर त्यांच्या अर्थविषचक सूचना व कल्पनांचे सादरीकरण करणार आहेत.
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सादरीकरण ५ जुलैला सादर करणार आहेत. यापुढे अंतरिम अर्थसंकल्पाऐवजी केंद्रीय अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प हा तत्कालीन प्रभारी केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केला होता.