भूतान - डिजीटल क्रांतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेला भारताच्या रुपे कार्डचा भूतानमध्ये नागरिकांना लाभ घेता येत आहे. भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय 'रुपे कार्ड' लाँच केले. रुपेचे लाँचिग करण्यासाठी मोदींनी ऐतिहासिक अशा सिमटोखा ड्झोंगा येथे खरेदी केली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुपे कार्डचे भूतानमध्ये लाँच - लोटे शेअरिंग
रुपे कार्ड हे भारत सरकारचे डिजीटल माध्यम आहे. त्याचा वापर कमी रक्केच्या हस्तांतरणासाठी करण्यात येतो.
रुपे कार्ड हे भारत सरकारचे डिजीटल माध्यम आहे. त्याचा वापर कमी रक्केच्या हस्तांतरणासाठी करण्यात येतो. भूतानमध्ये रुपे कार्डची योजना दोन टप्प्यात लाँच करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय बँकांकडून भूतानमध्ये प्रवासासाठी येणाऱ्या पर्यटकांना रुपे कार्ड देण्यात येणार आहे. तसेच हे कार्ड भूतानच्या नागरिकांनाही देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात भूतानच्या बँकांकडून त्यांच्या नागरिकांना रुपे कार्ड देण्यात येणार आहे.
भारत व भूतानमध्ये विविध पाच विषयांवर सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह व भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेअरिंग हे उपस्थित होते.