नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक बातमी आहे. सलग सहा महिने निर्यातीत घसरण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये निर्यातीत सुधारणा झाली आहे. सप्टेंबरमध्ये निर्यात ५.२७ टक्क्यांनी वाढून २७.४ अब्ज डॉलर झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असल्याचे सूचित होत असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा सप्टेंबरमध्ये निर्यातीचे प्रमाण हे ५.२७ टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीचे प्रमाण हे २६.०२ अब्ज डॉलर राहिले होते. यंदा सप्टेंबरमध्ये निर्यातीचे प्रमाण २७.४ अब्ज डॉलर आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षाच्या ऑगस्टमध्ये निर्यातीचे प्रमाण १२.६६ टक्क्यांनी घसरून २२.७ अब्ज डॉलर झाले होते.