महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच - मराठी बिझनेस न्यूज

दिल्लीत पेट्रोलचा दर २१ सप्टेंबरपासून  प्रति लिटर १ रुपया ६० पैशांनी वाढला आहे. आठवभरापासून पेट्रोलचे दर चेन्नईत १.६७ रुपयाने , मुंबईत १.६४ रुपयाने आणि कोलकातामधील १.६६ रुपयाने वाढले आहेत.

पेट्रोल दर

By

Published : Sep 23, 2019, 12:39 PM IST

नवी दिल्ली- सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यानंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आठवडाभरापासून वाढत आहेत. पेट्रोलचे दर आठवडाभरात १ रुपया ६० पैशांनी वाढले आहेत. सलग सातव्या दिवशी वाढलेल्या इंधन दराने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

पेट्रोलचा दिल्लीत दर प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ७३.६२ रुपये झाला. तर डिझेलचा दर १८ पैशांनी वाढून ६६.७४ रुपये झाला आहे. शनिवारच्या तुलनेत पेट्रोलचे दर चेन्नईत २८ पैशांनी, मुंबईत २७ पैशांनी, कोलकातामध्ये ३१ पैशांनी वाढले आहेत.

हेही वाचा-शेअर बाजाराची १३०० अंशाची उसळी; निर्देशांकाने गाठली पुन्हा ३९,००० ची पातळी

आठवडाभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड-
दिल्लीत पेट्रोलचा दर २१ सप्टेंबरपासून प्रति लिटर १ रुपया ६० पैशांनी वाढला आहे. आठवभरापासून पेट्रोलचे दर चेन्नईत १.६७ रुपयाने , मुंबईत १.६४ रुपयाने आणि कोलकातामधील १.६६ रुपयाने वाढले आहेत. दिल्लीमधील डिझेलचे दर १४ सप्टेंबरनंतर १ रुपयाने वाढले आहेत. तर दिल्लीत १.३७ रुपयाने, मुंबईत १.४७ रुपयाने, कोलकातामध्ये १.३७ रुपयाने वाढले आहेत.

हेही वाचा-कॉर्पोरेट करातील कपातीने शेअर बाजाराची विक्रमी २२०० अंशाची उसळी! उद्योगातही उत्साह

पेट्रोल व डिझेलचे दर हे ५ ते ६ रुपयाने वाढण्याची शक्यता -

सौदी अरेबियामध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन घेणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ड्रोन हल्ल्यानंतर तेथील उत्पादन थांबल्याने जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार देशात पेट्रोल व डिझेलचे दर हे ५ ते ६ रुपयाने वाढण्याची शक्यता आहे.
सरकारमधील सूत्राच्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या तर त्याचा ग्राहकांवर बोझा लादण्यात येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details