नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत त्यांनी अर्थव्यवस्थेवर बोलावे, अशी लोकांची इच्छा असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. लोकांना वाईट शब्द आणि अलंकारिक भाषा ऐकायची नाही, असा चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोला लगावला.
पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना वस्तुस्थिती समोर येवू द्यायची नाही, असे दिसते. त्यांनी आर्थिक प्रश्नावर बोलावे, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला सूचविले.
पुढे चिदंबरम म्हणाले, दिल्लीच्या निवडणुकीत बोलावे अशा तीन गोष्टी आहेत. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये महागाई २ टक्क्यांनी वाढून ७.३५ टक्के झाली आहे.