नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त सभागृहात अभिभाषण करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता अभिभाषण करणार आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे राज्यसभेतील नेत्यांची बैठक त्यांच्या घरी घेणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीला असणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ मार्चला सुरू होवून ३ एप्रिलला अधिवेशन संपणार आहे. संसदेच्या वाचनालयात भाजपच्या कार्यकारी समितीची बैठक दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही संसदेच्या वाचनालयात दुपारी साडेतीन वाजता घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या भाषणात 'या' वापरण्यात येतात महत्त्वाच्या संज्ञा, जाणून घ्या अर्थ