मुंबई- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे दिसत नसल्याचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रीय नमुने सर्व्हे कार्यालयाने (एनएसएसओ) दिलेली बेरोजगारीची आकडेवारी चुकीची असल्याचाही त्यांनी दावा गेला. ते मुंबईमध्ये भाजपच्या प्रचार मोहिमेसाठी आले होते.
काही लोक संघटितपणे सरकारविरोधात काम करत आहेत. त्यांनी बेरोजगारीवरून लोकांची दिशाभूल केली, असा रवीशंकर प्रसाद यांनी दावा केला. पुढे ते म्हणाले, की जर तुम्हाला १० निकष दिले तर अर्थव्यवस्था चांगली काम करत असल्याचे दिसेल. मात्र, यामधील एकही निकष एनएसएसओच्या अहवालात नव्हता. त्यामुळे तो अहवाला चुकीचा असल्याचे माझे म्हणणे आहे.