नवी दिल्ली- देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वर्ष २०२०-२१ मध्ये ७.७ टक्के घसरेल, असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) केला आहे.
चालू आर्थिक जीडीपी १३४.४० लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये जीडीपी अंदाजित १४५.६६ लाख कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रिअल जीडीपी ७.७ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आहे. हा अंदाज मागील आर्थिक वर्षाचा विकासदर असलेल्या ४.२ टक्क्यांच्या तुलनेत आहे.
हेही वाचा-दिलासादायक! नोकरी भरतीत डिसेंबरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ
- चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रात ९.४ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे.
- मागील आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राचा विकासदर जवळजवळ शून्य म्हणजे ०.०३ टक्के होता.
- खाण उद्योगात लक्षणीय घसरण होईल, असा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अंदाज केला आहे.
- व्यापार, हॉटेल, वाहतूक, संवाद, सेवा आणि प्रसारण क्षेत्रातही घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
- कृषी क्षेत्राचा विकासदर हा ३.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर मागील आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा ४ टक्के विकासदर होता.