मुंबई- गुजरामधील गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुढाकार घेतला आहे. एनएसईने सिंगापूर शेअर बाजाराबरोबर (एसजीएक्स) संयुक्तपणे प्रस्ताव तयार केला आहे.
गुजरातच्या गिफ्ट सिटीत सुरू होणार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ; एनएसई व सिंगापूर शेअर बाजाराचा संयुक्त प्रस्ताव
एनएसई आणि एसजीएक्सच्या प्रस्तावाला संबंधित नियामक संस्थांकडून मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, एनएसई आणि एसजीएक्स हे ट्रेडिंग करण्यासाठी परस्परांशी जोडण्यात येणार आहे.
एनएसई आणि एसजीएक्सच्या प्रस्तावाला संबंधित नियामक संस्थांकडून मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, एनएसई आणि एसजीएक्स हे ट्रेडिंग करण्यासाठी परस्परांशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे निफ्टीचे उत्पादने ही गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीत (गिफ्ट सिटी) विकणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय लोकांना बाजारामध्ये सहभागी होणे शक्य होणार आहे.
'कनेक्ट मॉडे'लला आणखी काही स्थानिक संस्थांकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर एसजीएक्स, एनएसई आयएफएससीच्या सदस्यांना गिफ्ट सिटीमधील निफ्टीची उत्पादने घेता येणार आहेत. त्यासाठी परस्परांमध्ये सहकार्य करण्यात येणार आहे. सिंगापूर शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार हे संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर काम करत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आणि सिंगापूर शेअर बाजार हे २०२० पूर्वी जोडण्यात येणार आहे. मात्र हे सर्व परवानग्या मिळणे आणि दोन्ही शेअर बाजारामधील सदस्यांच्या तयारीवर अवलंबून असणार आहे.