नवी दिल्ली - रोजगार कमी झाल्याचे दाखविणारे कोणतेही कारण नाही, असे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत सांगितले. नोटाबंदीमुळे नोकऱ्यांवर परिणाम झाला का?, या विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
नोटाबंदीनंतर आपल्या मतदारसंघातील अनेकांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. यासंदर्भात सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत का, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी रोजगार निर्मितीसाठी सरकार विविध योजना राबवित असल्याचेही सांगितले. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या संधीच्या शोधात देशात कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार असल्याचे गंगवार यांनी सांगितले. घटना सर्व नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देते. ते देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे फिरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.