नवी दिल्ली - चालू वर्षात १ कोटींहून अधिक कराचे विवरणपत्र भरणाऱ्या प्राप्तिकरदात्यांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात कोट्यधीश प्राप्तिकरदात्यांची संख्या ९७ हजार ६८८९ आहे. तर गतवर्षी ८१ हजार ३४४ जणांनी १ कोटींहून अधिक करासाठी विवरणपत्र भरले होते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कोट्याधीश करदात्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कोट्याधीश कॉर्पोरेट, संस्था, वैयक्तिक आणि अविभक्त कुटुंबाची माहिती आहे. देशातील ५.८७ कोटींहून अधिक प्राप्तिकरदात्यांनी १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत विवरणपत्र भरले आहे. यामध्ये ५.५२ कोटी जणांनी वैयक्तिक अर्ज दाखल केले आहेत. तर ११.३ लाख हिंदू अविभक्त कुटुंब आहेत. तर १२.६९ लाख संस्था (फर्म) तर ८.४१ लाख कंपन्या आहेत.