महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चिंतेचे कारण नाही, बँकिंग व्यवस्था सुरक्षित - भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - बँकिग शेअर

काही ठिकाणी सहकारी बँकांसह इतर बँकांबाबत अफवा आहेत. अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका, असा आरबीआयचा सल्ला आहे. या आशयाचे केंद्रीय मध्यवर्ती बँकेने ट्विट केले आहे.

संग्रहित - भारतीय रिझर्व्ह बँक

By

Published : Oct 1, 2019, 8:00 PM IST

मुंबई - समाज माध्यमांमध्ये बँकांच्या कामकाजाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. अशा निराधार अफवांमुळे ठेवीदारांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, असेही आरबीआयने म्हटले आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था सुरक्षित व स्थिर असल्याचे ट्विट करत आरबीआयने सामान्य लोकांना आश्वस्त केले आहे.


पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेसह बँकिंग क्षेत्रातील इतर नकारात्मक वृत्त सोमवारी माध्यमांमधून आले होते. त्याचा परिणाम म्हणून निफ्टीचा बँक निर्देशांक १.३० टक्क्यांनी घसरला होता.

हेही वाचा-‘पीएमसी’ बँकेवर निर्बंध म्हणजे नोटबंदीची पुनरावृत्ती - गौरव वल्लभ

काय म्हटले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने ट्विटमध्ये!
काही ठिकाणी सहकारी बँकांसह इतर बँकांबाबत अफवा आहेत. अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका, असा आरबीआयचा सल्ला आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी पडझड; बँकेसह वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आपटी

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीत बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण आज झाली आहे. येस बँकेचे शेअर सर्वात अधिक २२ टक्क्यांनी घसरले आहेत. तर आरबीएल, इंडसइंड बँक, एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर निफ्टीत ५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

हेही वाचा-मारुतीच्या वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २४ टक्के घसरण

या बँकावर भारतीय रिझर्व्ह बँकेने केली कारवाई

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन फिर्यादी जसबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरुन बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या खातेदारांनी सहा महिन्यापर्यंत १० हजार रुपये काढण्याची मर्यादा आरबीआयने घालून दिली आहे.

लक्ष्मी विलास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची (पीसीए) कारवाई केली आहे. वाढलेल्या बुडित कर्जासह (एनपीए) इतर कारणांमुळे लक्ष्मी विलास बँकेला वित्तीय शिस्त लागण्यासाठी आरबीआयने ही कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details