नवी दिल्ली- अँजल कराबाबत स्टार्टअप क्षेत्राला वाटणाऱ्या सर्व चिंतांचा निपटारा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी आता कोणतीही चिंता न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे चेअरमन पी.सी. मोडी यांनी दिला. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
चर्चेच्या प्रक्रियेतून स्टार्टअपशी संबंधात असणारे सर्व कायदेशीर मुद्दे सोडविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख असल्याचे सीबीडीटीचे चेअरमन पी.सी.मोडी यांनी म्हटले. औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) आणि सीबीडीटी विभाग स्टार्टअपशी संबंधामधील प्रश्न सोडविण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करत आहे.