गुवाहाटी- भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणांचे हिरवे कोंब (ग्रीन शूट्स) दिसत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. दिल्लीमधील हिंसेचा आणि सध्या देशात सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनाचा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या माध्यमांशी गुरुवारी बोलत होत्या.
दिल्लीमधील हिंसेत सुमारे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण जखमी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, नुकताच रियाधमध्ये झालेल्या मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत भारतामधील घटनांवर चिंता व्यक्त झाली नाही. काही महत्त्वाच्या गुंतवणूकदारांनी भारतामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात कार्यालये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची अद्याप, देशात कार्यालये नाहीत. विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झालेला नाही.
हेही वाचा-व्होडाफोन आयडियाने सरकारकडे केली 'ही' चक्रावून टाकणारी मागणी