महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2019, 8:42 PM IST

Updated : Sep 20, 2019, 12:55 PM IST

ETV Bharat / business

भारतात आर्थिक अरिष्ट नाही, प्रकाश जावडेकर यांचा दावा

अर्थव्यवस्था मंदावली असताना ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने काँग्रेसने  टीका केली आहे.  यावर बोलताना जावडेकर म्हणाले, हाउडी मोदी कार्यक्रमासाठीचे सभागृह हे पूर्ण भरले आहे. काँग्रेसला अशी लोकप्रियता मिळाली नाही व मिळणार नाही. 'द्राक्षे आंबट', एवढेच म्हणू शकतो.

प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली - भारतात आर्थिक आरिष्ठ नाही, असा दावा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आवश्यक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. जावडेकर हे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, अर्थव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत. अर्थव्यवस्थेची पायाभूत तत्वे ही मजबूत असल्याचे मला सांगायचे आहे. आपल्यावर कोणतेही संकट नाही. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून काही प्रतिक्रिया येत आहेत. हे सर्व प्रश्न सोडवित आहोत, अशी त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा- ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर

अर्थव्यवस्था मंदावली असताना ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचे केले जात असल्याने काँग्रेसने टीका केली आहे. यावर बोलताना जावडेकर म्हणाले, हाउडी मोदी कार्यक्रमासाठीचे सभागृह हे पूर्ण भरले आहे. काँग्रेसला अशी लोकप्रियता मिळाली नाही व मिळणार नाही. 'द्राक्षे आंबट', एवढेच म्हणू शकतो. दिग्विजय सिंह यांना काँग्रेसदेखील गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या विधानावर का प्रतिक्रिया द्यावी, असे ते म्हणाले. यापूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांची मानसिकता आम्ही पाहिली आहे.

हेही वाचा-'या' सरकारी कंपनीत ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध

दरम्यान, भगव्या कपड्यामधील लोक मंदिरातही बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी भोपाळमध्ये केले होते.

Last Updated : Sep 20, 2019, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details