नवी दिल्ली - वाहन उद्योगातील हंगामी मनुष्यबळामध्ये कपात झाली आहे. मात्र नोकऱ्या कमी झालेल्या आकडेवारीची पुष्टी झालेली नाही, असे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
वाहन उद्योगातील विक्रीत घट झाल्याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लेखी उत्तर राज्यसभेत दिले. या उत्तरात त्यांनी अनेक अर्थव्यवस्थांमध्ये चक्रीय मंदावलेली स्थिती असल्याचे सांगितले. सर्व श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत एप्रिल ते डिसेंबर २०१९ मध्ये घट होवून १७.१ दशलक्ष वाहनांची विक्री झाली. तर वर्ष २०१८ मध्ये एप्रिल ते डिसेंबरमध्ये वाहनांची एकूण विक्री ही २०.३ दशलक्ष वाहनांची विक्री झाली होती. वाहन विक्रीत घट झाल्याचे त्यांनी मान्य केले.
हेही वाचा-सीतारामन यांच्या अर्थसंकल्पामुळे राज्यांचे १ लाख ५३ हजार कोटींचे नुकसान