महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक परिषदेची १५ जूनला बैठक; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

नीती आयोगाची नियामक परिषद ही नीती आयोगाची मुख्य संस्था आहे. या परिषदेच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल आणि विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संग्रहित - नीती आयोगाची नियामक परिषद

By

Published : Jun 4, 2019, 7:20 PM IST


नवी दिल्ली - पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियाक परिषदेची १५ जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत जलव्यवस्थापन, कृषी आणि सुरक्षा अशा विविध विषयावर चर्चा होणार आहे.

नीती आयोगाची नियामक परिषद ही नीती आयोगाची मुख्य संस्था आहे. या परिषदेच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल आणि विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच नियाक परिषदेची बैठक पार पडत आहे. नीती आयोगाने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना परिषदेचे निमंत्रण पाठविल्याचे सूत्राने सांगितले.

डाव्या विचारसरणीच्या कट्टर लोकांकडून झारखंड, छत्तीसगडसारख्या राज्यातील काही जिल्ह्यात होणाऱ्या धोक्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. या समितीची बैठक नियमितपणे पार पडते. पहिली बैठक ही ८ फेब्रुवारी २०१५ ला पार पडली होती. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची चौथी बैठक १७ जून, २०१८ ला झाली होती. त्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपाययोजना आणि महत्त्वाच्या सरकारी योजनांचा आढावा घेण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details