नवी दिल्ली - चिनी उद्योजकांनी भारताकडे निर्यातीचे केंद्र म्हणून पाहावे, अशी विनंती नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केली. चिनी उद्योजक भारतामधून विविध देशांमध्ये वस्तू निर्यात करू शकतील, असेही त्यांनी सांगितले. ते चीन-भारत भागीदारी मंचामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय औद्योगिक महासंघाने (सीआयआय) केले होते.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, निर्यातक्षम गुंतवणूक करण्यासाठी आम्ही चीनचे स्वागत करतो. पायाभूत क्षेत्र, रस्ते, बंदरे, विमानतळे एवढेच नव्हेतर स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये चीनच्या गुंतवणुकीचे स्वागत आहे. अमेरिकेत निर्यात होवू शकणाऱ्या उद्योगांची चीनमध्ये गुंतवणूक आहे. त्याचप्रमाणे चिनी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. चीन, आफ्रिका अथवा अमेरिका कोणत्याही देशात निर्यात होणार असेल तर ती भारतामधून निर्यात होणार आहे. अशा प्रकारची गुंतवणूक खऱ्या अर्थाने चांगली आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगांना मंदीचा फटका; अशोक लिलँड महाराष्ट्रासह ५ राज्यांतील उत्पादन प्रकल्प ठेवणार बंद