नवी दिल्ली- नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली आहे.
नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांना दोन वर्षांची मुदतवाढ - मराठी बिझनेस न्यूज
केंद्र सरकारच्या आदेशानुसार कांत यांचा कार्यकाळ हा ३० जून २०१९ पासून दोन वर्षापर्यंत म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत राहणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार कांत यांचा कार्यकाळ हा ३० जून २०१९ पासून दोन वर्षापर्यंत म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत राहणार आहे. त्यासाठी पूर्वीच्याच अटी आणि शर्ती लागू असणार असल्याचे सरकारच्या आदेशात म्हटले आहे.
अमिताभ कांत यांची १७ फेब्रुवारी २०१६ ला नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सीईओ होण्यापूर्वी त्यांनी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या विभागाचे औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार असे नामकरण करण्यात आले आहे. नीती आयोग हा केंद्र सरकारची थिंक टँक म्हणून ओळखला जातो.