प्राप्तिकर अधिकारी आता तंत्रज्ञानाने साधणार करदात्यांशी संवाद - निर्मला सीतारामन - निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसह टॅक्स प्रॅक्टिशनर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, देशात कानपूर, गुवाहाटी, पुणे आदी शहरांना भेट देण्यात येणार आहे.
अहमदाबाद - करदात्यांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशातील मेट्रो शहर आणि श्रेणी -२ शहरांना भेटी देणार आहेत. यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी आज अहमदाबादला भेट दिली. प्राप्तिकर अधिकारी हे करदात्यांशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संवाद साधणार असल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले. या माध्यमातातून विविध क्षेत्राकडून करण्यात येणाऱ्या तक्रारीवर तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसह टॅक्स प्रॅक्टिशनर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, देशात कानपूर, गुवाहाटी, पुणे आदी शहरांना भेट देण्यात येणार आहे. सतत प्राप्तिकर भरणाऱ्यांकडून माहिती मागविणे योग्य नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुविधा अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- प्रत्येक क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत.
- समस्या सोडविण्यासाठी रोडमॅप व पॅकेजबाबात आताच सांगणे कठीण आहे. मात्र पंतप्रधान कार्यालय व मंत्रालयस्तरावर चर्चा सुरू आहे.
- काळा पैसा असलेल्या लोकांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. त्याचा डाटा नाही. मात्र मालमत्ता जप्त होत आहे.
- सोन्यासाठी आपण विदेशी चलन खूप देतो. त्याला अनुदान कसे द्यावे, असा त्यांनी सवाल केला.
- संपत्ती निर्माण करणाऱ्यांना आदर देवून त्यांचा सन्मान केला पाहिजे.
- मंत्रालयातील अधिकारी, सीबीडीटी, महसूल सचिव, सीबीआयसी या विभागातील अधिकाऱ्यांसह श्रेणी -२ शहरांना सीतारामन या भेट देणार आहेत.