नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना काश्मीरवरील कवितेचे वाचन केले. काश्मीर .....हमारा वतन खिलते हुए शालिमार जैसे..दल लेक मै खिलते हुए जैसा,,..नौजवानोंके खून जैसा...हमारा वतन..मेरा वतन,,सारे जहाँ मे प्यारा वतन.. ही अर्थमंत्र्यांनी सादर केलेली कविता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पंडित दीनानाथ कौल यांची आहे.
काश्मीरवरील कविता म्हणून अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर करण्यास सुरुवात - Budget 2020 India
निर्मला सीतारामन यांनी काश्मीरवरील कवितेचा अर्थही हिंदीत सांगितला. त्याचा अर्थ हा मातृभूमीमधील सरोवर हे कमळासारखे आहेत. जवानासारख्या गरम रक्तासारखे मातृभूमी आहे. आमची मातृभूमी ही सर्वात सुंदर आहे.
निर्मला सीतारामन यांनी काश्मीरवरील कवितेचा अर्थही हिंदीत सांगितला. त्याचा अर्थ हा मातृभूमीमधील सरोवर हे कमळासारखे आहेत. जवानासारख्या गरम रक्तासारखे मातृभूमी आहे. आमची मातृभूमी ही सर्वात सुंदर आहे. जम्मू काश्मीरसह, लडाख यांच्यासाठी अर्थसंकल्पात केंद्रशासित प्रदेशांसाठीची तरतूद करण्यात येणार आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरला सुमारे सात महिन्यापूर्वी स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर नुकतेच तिथे २जी इंटरनेटची सेवा सुरुवात करण्यात आली आहे.