नवी दिल्ली- सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळामधील (एलआयसी) हिस्सा विकण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केला. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकणार - केंद्रीय अर्थमंत्री - Budget 2020 Highlights
एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. तसेच एलआयसीचा आयपीओ आणणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी एलआयसीमधील हिस्सा विकण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. देशाची अर्थव्यवस्था १० टक्के विकासदर गाठेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. तसेच एलआयसीचा आयपीओ आणणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.
आयडीबीआय बँकेतील हिस्साही केंद्र सरकार विकणार आहे. दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या आयडीबीआय बँकेचा हिस्सा एलआयसीने विकत घेतला होता.