महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'एलआयसीमध्ये निर्गुंतवणुकीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांना संधी अन् शेअरमध्ये येईल पारदर्शकता'

नागरी गुन्ह्यांना फौजदारी गुन्ह्याप्रमाणे वागणूक देवू नये, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Nirmala Sitaraman
निर्मला सीतारामन

By

Published : Feb 7, 2020, 4:29 PM IST

Updated : Feb 7, 2020, 4:50 PM IST

मुंबई - प्राप्तिकर कायद्याचे फौजदारी स्वरूप काढण्याची इच्छा असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यापूर्वी कंपनी कायद्याचे फौजदारी स्वरुप काढल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत त्या विविध अर्थतज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी व व्यवसायिकांशी संवाद साधला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत आणि सरकारच्या धोरणाबाबत माहिती दिली आहे.

नागरी गुन्ह्यांना फौजदारी गुन्ह्याप्रमाणे वागणूक देवू नये, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

  • कर प्रणालीमध्ये सोपेपणा आणणे हे सध्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
  • थेट कर समितीने नेमलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे.
  • पीएमसी बँकेतील घटनेनंतर मुदत ठेवीवरील विमा संरक्षण वाढविण्याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ बाजारात खुला झाल्याने किरकोळ गुंतवणुकदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे शेअर अधिक पारदर्शक होणार आहेत.
  • मध्यमवर्गीयामधील फार मोठ्या घटकाला लाभांशावर कमी प्रमाणात प्राप्तिकर भरावा लागणार आहे. नव्या वित्तीय विधेयकामुळे त्यांच्या हातात अधिक प्रमाणात पैसा राहणार आहे.
Last Updated : Feb 7, 2020, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details