महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाने देशाचा जीडीपी घसरून ५.३ टक्के होणार - मूडीजचा अंदाज - GDP growth forecast

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने उपभोगत्यांच्या मागणीत परिणाम झाला आहे.

जीडीपी
जीडीपी

By

Published : Mar 17, 2020, 1:29 PM IST

नवी दिल्ली- मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे सकल उत्पन्न (जीडीपी) आणखी घटणार असल्याचा अंदाज केला आहे. कोरोनाचा परिणाम म्हणून भारताचा जीडीपी हा २०२० मध्ये ५.३ टक्के राहिल, असे मूडीजने म्हटले आहे. यापूर्वी फेब्रुवारीत मूडीजने देशाचा जीडीपी ५.४ टक्के राहिल, असे म्हटले होते.

यापूर्वी मूडीजने देशाचा जीडीपी हा ६.६ टक्के राहिल, असा अंदाज केला होता. त्यामध्ये आणखी घट होईल, असा अंदाज केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने उपभोगत्यांच्या मागणीत परिणाम झाला आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या प्रभावातून सावरला शेअर बाजार; निर्देशांकांची ५०० अंशांनी उसळी

जेवढा काळ पुरवठा साखळी विस्कळित होईल, तेवढ्या प्रमाणात जागतिक मंदी येण्याची शक्यता अधिक असल्याचे मूडीजने म्हटले आहे. भारताचा विकासदर २०२१ मध्ये ५.८ टक्के राहिल, असा मूडीजने अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने अनेक सरकार आणि मध्यवर्ती बँकांनी आर्थिक सुधारणांची घोषणा केली आहे. यामध्ये आर्थिक पॅकेज देणे आणि रेपो दर कमी करण्याचा समावेश आहे.

हेही वाचा-येस बँकेच्या शेअरची किंमत २३ रुपयांवरून ६० रुपये; जाणून घ्या, कारण

ABOUT THE AUTHOR

...view details