मुंबई- जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत हॉटस्पॉट करण्यासाठी आर्थिक सुधारणा सुरूच राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राला दिली. त्या भारतीय औद्योगिक महासंघाने आयोजित केलेल्या 'नॅशनल एमएनसी कॉन्फरन्स २०२०'मध्ये बोलत होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की महामारीच्या संकटाचे भारताने संधीत रुपातंरण केले आहे. त्यासाठी आर्थिक सुधारणा केल्या आहेत. या आर्थिक सुधारणा अनेक दशकांपासून रखडल्या होत्या, असेही त्यांनी म्हटले. पुढे त्या म्हणाल्या, की कोरोना महामारीच्या संकटातही
हेही वाचा...म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर तेजीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक आर्थिक सुधारणा करण्याची संधी दवडली नाही. आर्थिक सुधारणांची गती सुरुच राहणार आहे. काही आर्थिक सुधारणांशी संबंधित सक्रिय पावले उचलली जाणार आहेत. वित्तीय क्षेत्र अधिक व्यावसायिक झाले आहे. केंद्र सरकार निर्गुंतवणुकीचा अजेंडा सुरू ठेवेल, असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरला मोठा फटका; पाच दिवसांत ४८ टक्क्यांनी घसरण
यापूर्वीही सरकारकडून आर्थिक पॅकेजची घोषणा
केंद्र सरकारने ग्राहकांची मागणी आणि राज्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी आर्थिक सुधारणांची काही आठवड्यांपूर्वी घोषणा केली होती. आगामी सणाच्या मुहुर्तावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १२ ऑक्टोबरला एलटीसी कॅश व्हाउचर स्किम आणि स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्किमची घोषण केली आहे. तर केंद्र सरकारने मे महिन्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. केंद्र सरकारने जाहीर केलेले दुसरे आर्थिक पॅकेज ही रिअल जीडीपीच्या केवळ ०.२ टक्के असल्याचे मूडीज या पतमानांकन संस्थेने अहवालात म्हटले आहे. तर जीडीपीच्या केवळ एकूण १.२ टक्के पॅकेज असल्याचे मूडीजने म्हटले आहे.