नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यालयात ९ जानेवारीला बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.
पंतप्रधान हे गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ साठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तज्ज्ञांसमवेतची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हेही वाचा-शेअर बाजारातील फटका; गुंतवणूकदारांनी गमाविले ३ लाख कोटी रुपये
मागील बैठकीत पंतप्रधान मोदींनी कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी, आयटी इंडस्ट्रीचे टीव्ही मोहनदास पै, माजी वित्तीय सचिव हसमुख आढिया, टेक महिंद्राचे सीईओ सी. पी. गुरमानी यांनी सांगितले. इंटेल इंडिया महाव्यवस्थापक निवृत्ती राय आणि टीसीएसचे कार्यकारी अध्यक्ष राजेश गोपीनाथ यांची भेट घेतली होती.